बीड : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, पूजाच्या आई मंडूबाई चव्हाण यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असंही पूजाची आई म्हणाल्या आहेत. माझी मुलगी धाडसी होती. तिची हत्या आहे की आत्महत्या याबद्दल काहीच सांगता येत नाहीये. मला आणखी पाच मुली आहेत, आम्ही सगळेच आत्महत्या करणार आहोत. पूजाने आम्हाला काहीच सांगितलं नाही. दोन ते चार दिवसांत येते आणि भेटून जाते, असं तिने सांगितलं. बाकी काहीच बोलली नाही, असा खुलासाही पूजाच्या आईनं केलाय.
अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही. फक्त नावच ऐकलं आहे. ती आमच्यासाठी मुलासारखीच होती. सर्व तिला राखी बांधत होते. सर्वांची काळजी घ्या असं ती नेहमी सांगायची. आम्हाला काहीच माहीत नाही, उगाच काही तरी बदनामी करायची, त्यांना काही मुलीबाळे नाहीत काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस