मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात नाव समोर आल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणावर भूमिका मांडली. “संजय राठोड यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणीती आहे. भाजप नेत्यांची महिलांबाबतची डझनभर प्रकरणे मला सांगता येतील. पण भाजपा नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन योग्य केले. लवकरच याप्रकरणातील सत्य बाहेर येईल,” असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

राठोड यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला शिवसेनेकडून अजूनही दुजोरा देण्यात आलेला नाही. राठोडांनी राजीनामा मातोश्रीवर पाठवल्याचीच चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणावर शिवसेनेचे मंत्री आणि नेतेही सावध भूमिका घेताना दिसत आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
