मुंबई : अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर नवनवीन खुलासे होत आहे. सचिन वाझे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माणूस आहे. त्यांनाच रिपोर्टिंग व्हायचं. परमबीर सिंग यांना ते विचारतच नव्हते, असा गंभीर आरोप भाजप नेते नितेश राणेंनी केला आहे. राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप करत ‘सचिन वाझे वर्षावर जाऊन कसे राहायचे? त्यांना कुणी परवानगी दिली?’, असा सवाल केला आहे.
सचिन वाझे थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना रिपोर्टिंग करायचे. परमबीर सिंह यांना ते विचारायचे नाहीत. ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते. म्हणूनच त्यांना वाचवायचे प्रयत्न होत असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस