मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता यामध्ये मोठी कलाटणी मिळाली आहे. संबंधित महिलेविरोधात अनेकांनी ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. यानंतर महिलेने आपण एकटी पडली असून पोलीस एफआयआर दाखल करत नसल्याची तक्रार केली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुख यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पीडित महिला आपला जबाब नोंदवला जात नसल्याची तक्रार करत असून एफआयआर दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्यासंबंधी अनिल देशमुख यांना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले की, “कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही.
आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल”.‘कायदेशीर कारवाई सुरु असून त्याप्रकारे कारवाई होईल. तपासात जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
