आटपाडी : डाळिंबाला उच्चांकी दरासोबतच आटपाडी या दुष्काळी भागासोबतच सांगली, सातारा, सोलापूर जिल्यातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर व सेवा देण्यासोबतच शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी लक्ष्यात घेऊन त्यांना डाळिंब सल्ला मार्गदर्शन, खते-औषधे मार्गदर्शन, औषधे कंपन्या मार्फत सल्ला, विविध डाळिंब तज्ञांचे मार्गदर्शन, अशा प्रकारातील योग्य अशी मदत करून शेतकरी वर्गाला आपल्या मंगलमुर्ती उद्योग समूहाच्या च्या माध्यमातून पंढरीनाथ (नाना) नागणे. यांनी व्यापारासोबतच सामाजिक जाणीव ठेऊन शेतकरी बांधवांचे हित साधले आहे, व मोठ्या प्रमाणात देशातील कानकोपऱ्यातील व्यापारी वर्ग आटपाडी मध्ये आणून डाळिंबाला रेकॉर्ड ब्रेक असे दर मिळवून दिल्याबद्दल आटपाडी चे नावलौकिक मध्ये भर पडली. याचीच दखल घेऊन माणदेशातील शेतकरी बांधवामार्फत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी यांच्या सहकार्याने डाळिंबरत्न पंढरीनाथ (नाना) नागणे यांचा सत्कार व अभिनंदन सोहळा मार्केट कमिटी आटपाडी येथे संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी चे सभापती भाऊसाहेब गायकवाड सचिव शशिकांत जाधव, प्रगतशील शेतकरी संदिप देशमुख, दादासाहेब देशमुख, विलास पाटील, संजय देशमुख, शरद पाटील, उमेश देशमुख, शीतल मोरे, महादेव कुंभार, संभाजी कुंभार, संजय पाटील, बाबुराव पाटील, मा. बालेखान शेख यांच्यासह डाळिंब व्यापारी वसंतशेठ खराडे, सुजित पंढरे, बाळासो सरगर , दिलीप जाधव, संगप्पा सज्जन, विजय पवार, शरद काळे, वसंत विभुते, सोनू पंडित, मोहीन खान, लक्ष्मण पुजारी, सुनील सरगर, स्वप्नील राक्षे, दत्ताशेठ मरगळे, अतिक बागवान, फारुखभाई, उत्तम काळे, याचबरोबर कर्मचारी वर्ग, हितचिंतक, तसेच आटपाडी तासगाव, जत, कराड, सोलापूर, मुंबई, बेंगलोर, कोलकाता, तसेच देशभरातील विविध राज्यातील व्यापारी वर्ग उपस्थित होते.
