मुंबई : शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या कंगनाची संकुचित वृत्ती अत्यंत किळसवाणी असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष निशाणा साधला आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, रिहानाचं ट्विट येताच भाजपच्या काही चमच्यांच्या प्रचंड पोटात दुखतंय. कंगणाने याबाबत ट्विट करत हे शेतकरी दहशतवादी आहे, असं म्हटलंय. मला या अशा लोकांना विचारायचं आहे. शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवणारे तुम्ही कोण? असा सवाल त्यांनी केला.
किमान आपण ज्या देशात राहतो, ज्या देशाचं अन्न खातो, ते अन्न या अन्नदात्याने पिकवलं आहे. या शेतकऱ्याने पिकवलं आहे. याचं भान ठेवलं तर आपल्याला स्वतःला आपली लाज वाटेल. रिहाना यांना या देशाच्या शेतकऱ्यांची काळजी वाटते. त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यावेळेस कंगना अशा पद्धतीने ट्विट करत दहशतवादी ठरवते. तिची ही संकुचित वृत्ती अत्यंत किळसवाणी असल्याचे म्हणत चाकणकर यांनी कंगनावर निशाणा साधला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
