मुंबई : काही महिन्यांपूर्वी गुजरात काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत कार्याध्यक्षपदाची जबाबदारी घेणारे हार्दिक पटेल यांनी आज सकाळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या खाजगी निवास्थानी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
मात्र काही दिवसांपासून हार्दिक पटेल काँग्रेस पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्ताराच्या दृष्टिकोनातून गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांची चाचपणी करत आहे की काय अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. त्याच अनुषंगाने ही भेट होती, अशी चर्चा आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस