मुंबई : काल दिनांक २५ रोजी माजी केंद्रीय राज्यमंत्री व रिपाई नेते रामदास आठवले यांचा वाढदिवस संपन्न झाला. त्यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या. पण, या सर्वात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या शुभेच्छा मात्र हटक्या ठरल्या असून सोशल मिडीयातून त्या सर्वत्र पहावयास मिळत आहेत.
त्यांनी या शुभेच्छा खुद्द आठवलेंच्याच शैलीत म्हणजेच एका कवितेच्या माध्यमातून दिल्या आहेत. या कवितेत देशमुखांनी रामदास आठवले यांचा उलेल्ख “राजकारणातील कवी दबंग” असा केला आहे.
’’अनिल देशमुख कवितेत म्हणतात….
बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी
बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी
पण आज दिवस आहे जल्लोषाचा
कारण वाढदिवस आहे भारी कवीचा
युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग
आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग
आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
गृहमंत्री अनिल देशमुखांनी कवितेची सुरुवात कडाक्याच्या थंडीपासून केली आहे. तसेच सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीचाही उल्लेख या कवितेत केला आहे. त्यामुळे रामदास आठवलेंना दिलेल्या या शुभेच्छा सध्या अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहेत.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस
