मुंबई : मुंबई पोलिसांनी नवीन वर्षाच्या दिवशी दक्षिण मुंबईतील एका गोदामावर छापा टाकत तब्बल १.२२ कोटी रुपये किंमतीचे प्रतिबंधीत गुटखा व पान मसालांचा साठा जप्त केला व याच बरोबर १.२२ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली.
क्राईम इंटेलिजेंस यूनिट (सीआययू) चे अधिकारी सचिन वेज यांना प्रतिबंधीत गुटखा आणि पान मसालाच्या विशाल साठयाची माहिती मिळाली. याच्या आधारावर शुक्रवारी एका टिमने नागपाडा भागातील भरत बाजार भागात छापा टाकला. या राकेटमध्ये सामिल दोन लोकांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना सेवरी मॅजिस्टेट कोर्टच्या समोर हजर करण्यात आले. यानंतर या दोघांना सोमवार पर्यंत पोलिसांच्या ताब्यात पाठविण्यात आले.
संयुक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी सांगितले की याच बरोबर क्राइम इंटेलिजेंस यूनिटच्या टिमने निर्माता, पुरवठाकर्ता, स्टॉकिस्ट आणि कंट्राबेंड सामानाच्या विक्रत्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे आणि नागपाडा पोलिस स्टेशनद्वारा पुढील तपास केला जात आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज