मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता फैलाव रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शकतत्वे लागू केली आहेत. कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते.
केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. केरळमधून रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी सरकारचा आदेश बंधनकारक आहे. हवाई मार्गाने महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
