मुंबई : उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सरकारी बंगल्याच्या डागडुजीसाठी महाराष्ट्र सरकारने पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी नितीन राऊत यांच्यावर आरोप करत घराचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
एकीकडे वाढीव बिलात कोणतीही सूट द्यायची नाही आणि त्याचा नाहक भुर्दंड सर्वसामान्यांना भोगावा लागत असताना मंत्र्यांच्या बंगले आणि कार्यालयांच्या नुतनीकरणावर कोट्यावधी रुपये कसे खर्च केले जातात ? असा सवाल पाठक यांनी केला आहे.
सरकार पैसे नाही म्हणतं, शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापतं, कोरोना योद्ध्यांना पगार देत नाही. मात्र उर्जामंत्री नितीन राऊत यांचं सरकारी कार्यालय आणि बंगल्यावर जाऊन पाहा, कसे पैसे उधळतायत, अशी जोरदार टीका पाठक यांनी केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या चार्टर्ड विमान प्रवासाबाबतही भाजपने प्रश्न उपस्थित केले होते.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस