• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

महाराष्ट्र सरकारने केले सातबारा उताऱ्यात नवीन बदल

tdadmin by tdadmin
February 7, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं सातबारा उताऱ्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय 2 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता सरकारनं सुधारित सातबारा उताऱ्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ‘गाव नमुना-7’ मध्ये खालील बदल सूचित करण्यात आले आहेत.


• ‘गाव नमुना-7’ मध्ये गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक म्हणजेच Local Government Directory टाकण्यात येणार आहे.


• लागवडी योग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्ररित्या दर्शवून त्यांची एकूण बेरीज करून एकूण क्षेत्र नमूद करण्यात येणार आहे.


• शेती क्षेत्रासाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार असून बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार आहे.


• यापूर्वी खाते क्रमांक ‘इतर हक्क’ या रकान्यात नमूद केला जात असे. आता तो खातेदाराच्या नावासमोरच नमूद केला जाणार आहे.


• यापूर्वी मयत खातेदार, कर्ज बोजे, ई-कराराच्या नोंदी कंस करून दाखवल्या जात होत्या. आता ही माहिती कंस करून त्यावर एक आडवी रेष मारून त्यांना खोडलेलं दाखवण्यात येणार आहे.


• जे फेरफार प्रलंबित आहेत, ते इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे ‘प्रलंबित फेरफार’ म्हणून नोंदवण्यात येणार आहे.


• गाव नमुना-7 मधील सर्व जुने फेरफार क्रमांक आता नवीन नमुन्यात सर्वात शेवटी ‘जुने फेरफार क्रमांक’ या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शवण्यात येणार आहे.


• दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष काढण्यात येईल, जेणेकरूण खातेदारांची नावं स्पष्टपणे दिसतील.


• गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे, त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सगळ्यात शेवटी ‘शेवटचा फेरफार क्रमांक’ आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद करण्यात येणार आहे.


• बिनशेतीच्या सातबारा उताऱ्यावरील शेतजमिनीचं एकक ‘आर चौरस मीटर’ राहणार असून यात पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसंच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येणार आहेत.


• बिनशेतीच्या सातबारा उताऱ्यात सगळ्यात शेवटी “सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर-12ची आवश्यकता नाही” अशी सूचना देण्यात येणार आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Previous Post

धक्कादायक : आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या

Next Post

पंढरपूरमध्ये शिवसैनिकांकडून भाजपच्या माजी शहराध्यक्षाला तोंड काळे करून चोप देत जाहीर निषेध ; राम कदम यांनी केला संताप व्यक्त

Next Post

पंढरपूरमध्ये शिवसैनिकांकडून भाजपच्या माजी शहराध्यक्षाला तोंड काळे करून चोप देत जाहीर निषेध ; राम कदम यांनी केला संताप व्यक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी अभिनेत्याच्या गाडीला भीषण अपघात : सुदैवाने बचावला जीव

मराठी अभिनेत्याच्या गाडीला भीषण अपघात : सुदैवाने बचावला जीव

March 2, 2021
“अशा लोकांना कोरोना कधीही होणार नाही” : राज्यपाल कोश्यारी

“अशा लोकांना कोरोना कधीही होणार नाही” : राज्यपाल कोश्यारी

March 2, 2021
“सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा बंगालमध्ये मात्र बोहल्यावर बसणारा नवरा कोण आहे?”

“सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा बंगालमध्ये मात्र बोहल्यावर बसणारा नवरा कोण आहे?”

March 2, 2021
“मोदी सरकार सर्वसामान्यांच्या खिशात हात का घालत आहे?” : पृथ्वीराज चव्हाण

“मोदी सरकार सर्वसामान्यांच्या खिशात हात का घालत आहे?” : पृथ्वीराज चव्हाण

March 2, 2021
“शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका” : अभिनेत्री कंगनाने केली अशी मागणी

“शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका” : अभिनेत्री कंगनाने केली अशी मागणी

March 2, 2021
‘माझं आणि साहेबांचं नातं काय हे माझ्या बापाला जाऊन विचार भावा’ : चित्रा वाघ

‘माझं आणि साहेबांचं नातं काय हे माझ्या बापाला जाऊन विचार भावा’ : चित्रा वाघ

March 2, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143