• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

शिवजयंतीबाबत सरकारकडून नवी नियमावली जारी : शिवजयंतीला आता 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

tdadmin by tdadmin
February 12, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


मुंबई : दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला अवघ्या दहा लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली होती. यात बदल करत सरकारने नवी नियमावली जारी करून शिवजयंतीला आता 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या गृहविभागाने हे नवीन परिपत्रक जारी केलं आहे.


परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी, असं गृहविभागाने परिपत्रकात म्हटलं आहे.


तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं त्यात म्हटलं आहे.


शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम राबवून त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. Covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

 

Previous Post

शेतकऱ्यांची माफी न मागितल्यास… : काँग्रेस नेत्याची अभिनेत्री कंगनाला धमकी

Next Post

राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण अंतर्गत लसीकरण व “ear tag” सुरू : डॉ. पाटील

Next Post

राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण अंतर्गत लसीकरण व "ear tag" सुरू : डॉ. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘त्यांचा कुणीतरी मोठा बाप आहे तिथे तो त्यांना सांगत असावा’ : चित्रा वाघ

‘त्यांचा कुणीतरी मोठा बाप आहे तिथे तो त्यांना सांगत असावा’ : चित्रा वाघ

February 25, 2021
“जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत” : विनायक राऊत

“जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत” : विनायक राऊत

February 25, 2021

दोन मिनिटांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी बहुधा कानात सांगितलं असावं… : भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

February 25, 2021
भारताच्या “या” माजी क्रिकेटपटूचा भाजपामध्ये प्रवेश

भारताच्या “या” माजी क्रिकेटपटूचा भाजपामध्ये प्रवेश

February 25, 2021
सर्वसामान्यांना फटका : पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या

सर्वसामान्यांना फटका : पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या

February 25, 2021
मोटेरा स्टेडियम नामकरण : मरने से पहले स्टेडियम अपने नाम पर करा लिया। वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टिका

मोटेरा स्टेडियम नामकरण : मरने से पहले स्टेडियम अपने नाम पर करा लिया। वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टिका

February 25, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143