नवी दिल्ली : लोकसभेत बोलताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, आपल्याकडे लोकांना लस मिळत नाहीये, आणि तुम्ही जगभरात 72 देशांना कोरोना लस पोहचवत असल्याचा दावा कसा करता ? सध्या भारतीयांना लशीची सर्वात जास्त गरज आहे. लोक रांगेत उभे आहे. त्यामुळे आधी भारतातील लोकांना कोरोना लस द्या, त्यानंतरच जगभरात वाटा.
आपण इतरांचीही मदत केली पाहिजे. केलंच पाहिजे, ही भारताची संस्कृतीच आहे. पण त्याआधी सगळ्या भारतीयांचं लसीकरण झालं पाहिजे. प्रत्येक भारतीयाचं लसीकरण जेव्हा पूर्ण होईल, तेव्हाच जगभरात त्याचं वाटप करावं, असे जलील म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस