• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार : राज्यात पुढील १५ दिवस अधिकची सतर्कता ; उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्र संचारबंदी, युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

tdadmin by tdadmin
December 21, 2020
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. राहूल पंडीत, मुख्यमंत्र्यांचे पुणे विभागाचे सल्लागार दीपक म्हैसेकर आदी यावेळी उपस्थित होते.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणुची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पीटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

युरोप आणि मध्य-पूर्व देशातून प्रवास केलेल्यांनी देशांतर्गत विमान प्रवास केला असेल तर त्यांची माहिती त्यांनी देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Join Free WhatasApp  माणदेश एक्सप्रेस न्युज

Tags: #cm#Covid-19 Breking News#Covid-19 News#Uddhav-Thackeray
Previous Post

आटपाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई पासून लाभार्थी वंचित I कर्तव्यात कसूर करणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करण्याची उमाजी सरगर यांची मागणी

Next Post

केंद्र सरकारने मका आणि बाजरी खरेदीची मर्यादा वाढवावी- छगन भुजबळ

Next Post

केंद्र सरकारने मका आणि बाजरी खरेदीची मर्यादा वाढवावी- छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरपीआयचा बोर्ड कुणाला विचारून लावला, म्हणून खरसुंडी येथे एकाला मारहाण व जीवे मारण्याची धमकी

आरपीआयचा बोर्ड कुणाला विचारून लावला, म्हणून खरसुंडी येथे एकाला मारहाण व जीवे मारण्याची धमकी

February 27, 2021
राज्याच्या मुख्य सचिव पदी अखेर सिताराम कुंटे यांची नियुक्ती ; कोण आहेत सिताराम कुंटे?

राज्याच्या मुख्य सचिव पदी अखेर सिताराम कुंटे यांची नियुक्ती ; कोण आहेत सिताराम कुंटे?

February 27, 2021
आटपाडी तालुक्यात आज दिनांक २५ रोजीचे कोरोना रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २७ रोजी कोरोना २ तर जिल्ह्यात ३० नवे रुग्ण ; तालुका निहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

February 27, 2021
बार्टी मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

बार्टी मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

February 27, 2021

‘उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा अशा पद्धतींनी घेतल्या जाणार’ : उदय सामंत यांची घोषणा

February 27, 2021
“त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात” : कॉंग्रेस नेत्याचा दावा

“त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात” : कॉंग्रेस नेत्याचा दावा

February 27, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143