नवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी हाताळलेल्या यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सिन्हा यांचे चिरंजीव जयंत सिन्हा अजूनही भाजपमध्येच आहेत. झारखंडमधल्या हजारीबाग मतदारसंघाचे ते खासदार आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना मंत्रीपदही देण्यात आलं होतं. मात्र असलं तरी यशवंत सिन्हा सातत्याने पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत.
यशवंत यांनी 2009 मध्ये निवडणूक जिंकली. 2014मध्ये त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. तेव्हापासून नरेंद्र मोदी आणि त्यांच्यातलं अंतर वाढत गेलं. 2018मध्ये पक्षासाठी 21वर्ष काम केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस