लाहोर : टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तानचा माजी कॅप्टन शोएब मलिकच्या कारचा लाहोरमध्ये अपघात झाला. शोएबची कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातामध्ये कारचं मोठं नुकसान झालं आहे.
मलिक पाकिस्तान सुपर लिगच्या कार्यक्रमात गेला होता. त्या कार्यक्रमात त्याच्या स्पोर्ट्स कारची मोठी चर्चा झाली. मोहम्मद आमिर आणि बाबर आझम यांनी त्याची कार आवर्जून पाहिली. हा कार्यक्रम संपल्यानंतर वहाब रियाझ आणि शोएब मलिक आपआपल्या कारमधून घरी निघाले. त्यावेळी त्यांच्या कारमध्ये रेस सुरू झाली.

या रेसच्या दरम्यान अचानक शोएबच्या गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यावरील काही गाड्यांना धडकत बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातामध्ये कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. सुदैवानं शोएबला यामध्ये कोणती दुखापत झाली नाही. या अपघातानंतर मी पूर्णपणे बरा आहे, असं ट्विट शोएबनं केलं आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
