अहमदनगर : माजी मंत्री आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब हराळे हे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. बाळासाहेब हराळ हे विखे पाटील यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते असून जिल्हापरिषदेचे ते माजी सदस्य आहेत.
मनसुख हिरेन, सचिन वाझे आणि आता परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे मागील काही दिवसांपूसन महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, असे असले तरी राज्यात पक्षीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. सांगली आणि जळगामध्ये सत्ता मिळवल्यानंतर आघाडीच्या घटकपक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. भाजपचे अनेक नेते कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ हेसुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस