कराड : कृषी कायद्याविरोधात कराडमध्ये आंदोलन सुरु असून कोल्हापूर नाक्यावर रास्ता रोको करण्यात येत आहे. “शेतकऱ्यांचे कायदे करणाऱ्यांना शेती कशी करतात हे माहिती आहे का? शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अदानी अंबानी यांच्या फायद्याचे आहेत?” असा जळजळीत सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला विचारला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्त्वशीला चव्हाण मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना पोलिसांनी कारवाई केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
