करगणी येथे भीषण आगीत दुकाने खाक : करोडो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथे काल मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सात दुकाने भस्मसात झाली असून या आगी मध्ये करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सदरची आज पहाटे सहाच्या दरम्यान पूर्णता आटोक्यात आली. करगणी येथील आटपाडी -भिवघाट रस्त्यालगत अनेक दुकान गाळे आहेत. रविवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अरुण पांढरे यांच्या हार्डवेअर दुकानात आग लागली.
त्यालगत असलेले दिलीप सरगर यांच्या हार्डवेअर चे दुकान, नानासो पांढरे यांचे धान्य दुकान, पांडुरंग सरगर यांचे पेंडी चे दुकान, सूर्यवंशी भांडी सेंटर, अशोक पत्की यांचे पंढरपुरी चहाचे दुकान यांना आगिने वेढले. ही आग झपाट्याने विस्तारत गेली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सरपंच गणेश खंदारे यांनी तात्काळ मध्यरात्री आमदार अनिलभाऊ बाबर यांना संपर्क साधला. त्यानंतर विटा आणि तासगाव नगरपालिकेचे अग्निशामक वाहने दाखल झाली. गावातील तरुणांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आज पहाटे पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान आग आटोक्यात आली. त्यामुळे इतर दुकाने आगीपासून वाचवण्यात तरुणांना यश आले. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
Join Free Telegram माणदेश एक्सप्रेस