आटपाडी : आटपाडी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या दिघंची येथील ज्वेलर्स वर दोन अज्ञान दरोडेखोरणी फिल्मी स्टाईलने दरोडा टाकत दुकानातील सोने लंपास केल्याने दिघंची परिसरामध्ये खळबळ माजली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दिघंची येथे शुमभ ज्वेलर्स हे सराफी दुकान बाजारपेठेमध्ये आहे. दुपारी अंदाजे २.१५ च्या दरम्यान शुभम ज्वेलर्स मध्ये दोन अज्ञान दरोडेखोर आले व दुकानदाराळा चाकूचा धाक दाखवत दुकानातील सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने दुकानदराने मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी पळून जाताना दरोडेखोरांनी आपल्या आडवे आलेल्यांना चाकूचा धाक दाखवत शिवीगाळी केली.
दरोडेखोरांनी दरोडा टाकण्यासाठी दुचाकी गाडीचा वापर केला. सदर गाडीला नंबरप्लेट नव्हती. लुटलेले सोने घेवून त्यांनी लिंगीवरे मार्गाने सातारा जिल्ह्याकडे पळून गेले. भरदिवसा पडलेल्या या दरोड्याने दिघंची परीसरामध्ये खळबळ माजली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदरच्या घटनेची पोलिस माहिती घेत आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस