मुंबई : अॅमेझॉन प्राइमवरील ‘तांडव’ या वेबसीरीज विरोधात अनेकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. या वेबसीरीजविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशात अॅ मेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ‘तांडव’ या वेबसीरीजे निर्माते हिमांशू कृष्ण मेहरा, दिग्दर्शक अली अब्बास जाफर, लेखक गौरव सोलंकी यांच्यासह वेबसीरीजसंबंधी इतर लोक तसेच ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे त्या अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील ओरिजनल कटेंन्ट हेड अपर्णा पुरोहित यांच्याविरोधात लखनऊच्या हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोटक यांच्या पत्राची तात्काळ दखल घेत माहिती व प्रसारण मंत्रालयाने रविवारी रात्री अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील अधिकाऱ्यांना समन्स बजावले. तसेच या वेब सीरीजमधील हिंदू देवतांच्या कथीत अपमान आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
