बडोदा : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांचे वडील हिमांशु पांड्या यांचे आज, कार्डिअॅणक अरेस्टमुळे निधन झालं. बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्यानं वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.
बडोदा क्रिकेट असोसिएशनने मुख्य कार्यकारी आधिकारी शिशिर हटंगडी यांनी याला दुजोरा दिला आहे. शिशिर हटंगडी म्हणाले की, वैयक्तिक कारणामुळे क्रृणाल पांड्या बायो बबलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या दुखात सहभागी आहोत.
हार्दिक आणि कृणाल या दोघांनाही क्रिकेटपटू बनवण्यात हिमांषू यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी अनेक त्याग करून या दोघांनाही यशस्वी क्रिकेटपटू बनवले. काही दिवसांपूर्वी या दोघांबाबत बोलताना हिमांशू भावूक झाले होते. ते म्हणाले,”हार्दिक व कृणाल विषयी बोलताना मला अश्रू अनावर होत नाहीत. आम्ही त्यांना लहानवयापासूनच क्रिकेट खेळू दिले.
आमच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आणि नातेवाईकांनी टीकाही केली. पण, आम्ही आमच्या निर्धारावर ठाम राहीलो आणि या दोघांनी जे यश मिळवलंय, ते पाहून अभिमान वाटतो.”
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
