नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’चं आवाहन केलं आहे. या आवाहनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार, हा बंद सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत असेल. यादरम्यान दुकानं, मॉल आणि संस्था बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने पंजाबमध्ये रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा दिला आहे. त्याशिवाय दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठाही रोखण्याची धमकी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, एमएसपी व खरेदीवर कायदा बनवावा, शेतकऱ्यांवर दाखल केलेले सर्वप्रकारचे गुन्हे मागे घ्यावेत, वीज विधेयक, प्रदूषण विधेयक मागे घ्यावे, पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती कमी कराव्यात अशा आजच्या भारत बंदच्या मागण्या आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस