नवी दिल्ली : आम आदमी पार्टी (आप) चे पंजाब सह प्रभारी राघव चड्डानी यांनी पंजाबमधील मोगातील शेतकरी आंदोलनात प्राण गमविणारे माखन खान आणि गुरबचन सिंहच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयाना आर्थिक मदत दिली.
राघव यांनी सांगितले की 32 वर्षीय माखन खान आणि 80 वर्षीय गुरबचन सिंह हे आपल्या हक्काची लढाई लढत मृत्यूला सामोरे गेले. हे दोघेही शेतकरी केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत होते. सरकारने थोडी जरी संवेदनशीता दाखवली असती तर आज त्यांच्या कुटुंबाची स्थिती काही वेगळी असती आणि मोगातील या घरांमध्ये दुखाचे वातावरण नसते.
गुरबचन सिंह तीन दशका पासून किसान यूनियनचे सदस्य होते आणि मागील दोन महिन्या पासून ते एका कंपनीच्या बाहेर प्रदर्शन करत होते. 30 नोव्हेंबर 2020 ला त्यांचे दुखद निधन झाले.
माखन खानचे 14 डिसेंबर 2020 ला दिल्लीला लागून असलेल्या सिंधू सीमेवर निधन झाले होते. ते सीमेवरील प्रदर्शनात 26 नोव्हेंबर पासून सतत कृषी कायद्यांच्या विरोधात प्रदर्शन करत होते आणि ह्रदय झटक्याच्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस