मुंबई : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज देशव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारलं आहे. राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आलं आहे. देशभरात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर तीन तास हे आंदोलन केलं जाणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या काळात शाळेच्या बस, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वगळण्यात आलं आहे. किसान मोर्चाने ही माहिती दिली आहे.
चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लाल किल्ल्यावर मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
