नवी दिल्ली : देशासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. एकीकडे देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे कृषि कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. 60000 हून अधिक ट्रॅक्टर दिल्लीच्या सीमेवर सध्या उभे ठाकले आहेत. परंतू, पोलिसांनी सिंघू आणि तिक्री बॉर्डरवर रातोरात बॅरिकेड टाकून रस्ते अडविल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे दोन्ही सीमांवरील बॅरिकेड हटवून शेतकऱ्य़ांनी दिल्लीकडे कूच केले आहे.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळ ट्रॅक्टरच्या सहाय्याने बॅरिकेडस मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. पण ट्रॅक्टरच्या मदतीने काही शेतकऱ्यांनी बॅरिकेड तोडून दिल्लीकडे घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज करत या शेतकऱ्यांना माघारी जाण्यास भाग पाडले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
