आटपाडी : टेंभु सिंचन प्रकल्प आटपाडी डावा कालव्यासाठी मौजे पिंपरी बु।। व पडळकरवाडी येथील जमिनीचे संपादन कामासाठी भुमिअभिलेख कार्यालय, आटपाडी येथुन मोजणीचे नकाशे उपलब्ध होत नसले बाबत भुमि अभिलेख,कार्यालय आटपाडी यांचे कार्यालयास दि.१० रोजी कार्यालयास टाळेटोक आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी बु।। व पडळकरवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमीनीतुन टेंभु सिंचन प्रकल्प आटपाडी डावा कालव्यासाठी मौजे पिंपरी बु।। व पडळकरवाडी येथील ६० ते ६४ गटातुन कालवा गेला असुन अंदाजे ४० ते ४५ हेक्टर जमीनी कायमस्वरुपी संपादित होणार आहे. मागील १० वर्षापुर्वी या कालव्याची मोजणी करुन चुकीचे नकाशे दिले. यामध्ये दुरुस्ती करण्यात २ वर्ष गेली. यामध्ये दुरुस्ती होत नाही असे तालुका भूमी अभिलेख, आटपाडी यांनी सांगितलेबर लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग, आटपाडी या कार्यालयाने ३.५० लाख रुपये मोजणी खर्चासाठी दुसऱ्यांदा पेसे भरुन जुले व ऑगस्ट २०२० मध्ये परत सर्व गटांची संयुक्त मोजणी ओंकार शिंदे, मोजणीदार आटपाडी यांनी केलेली आहे.
मोजणी करुन ६ ते ७ महिने होऊन देखील संयुक्त मोजणीचे नकाशे अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाही. नकाशांसाठी पाठपुरावा करून देखील नकाशे देण्यास टाळाटाळ करत आहेत. याबाबत तत्कालीन तहसिलदार सचिन लंगुटे यांचेसोबत संयुक्त मिटींगही झालेली होती. तरी सुध्दा कोणतीही कार्यवाही झाली नाही. मौजे घरनिकी, पारेकरवाडी, कुरुंदवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमीनीचे थेट खरेदी व्यवहार करुन टेंभु खात्यामार्फत जमीन मोबदला वाटप सध्या सुरु आहे. यामुळे पिंपरी बु II, पडळकरवाडी येथील मोजणी नकाशे मिळालेस टेंभु खात्याकडे पैशासाठी पाठपुरावा करता येणार आहे. त्यामुळे संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तर दि. ०९ पर्यंत नकाशे न मिळालेस भुमि अभिलेख, कार्यालय आटपाडी यांचे कार्यालयास दि.१० रोजी टाळेटोक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सांगली, जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख, सांगली, उपविभागीय अधिकारी विटा व अधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय, आटपाडी यांना देण्यात आल्या आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस