चंदीगड : कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून आता भाजप नेत्यांना गावात प्रवेश करण्यास गावकरी विरोध करू लागले आहेत. हरियाणामधील चरखी दादरी जिल्ह्यातील एका गावात गावकऱ्यांनी राज्यातील सत्ताधारी भाजप आणि जननायक जनता पक्षाच्या नेत्यांना प्रवेशास मनाई केली आहे.

समसपूर गावामध्ये भाजप आणि जननायक जनता पक्षाच्या नेत्यांनी गावात प्रवेश करु नये अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. याबाबतचा बोर्डच त्यांनी थेट गावच्या वेशीवर लावला आहे.
दोन्ही पक्षांपैकी कोणत्याही पक्षाच्या नेत्याने गावात प्रवेश केला तर त्याची जाहीर मिरवणूक काढण्यात येईल असंही गावकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. जो शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे त्याच पक्षाला गावात प्रवेश दिला जाईल, असेही गावकऱ्यांनी म्हटले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
