मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक सागर सरहदी यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी घेतला अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. काल रात्री २१ मार्च रोजी त्यांचं निधन झालं.
सागर सरहदी ‘कभी कभी’, ‘चांदनी’ आणि ‘सिलसिला’ यां सारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखले जायचे. सागर सरहदी यांचा जन्म ११ मे १९३३ मध्ये पाकिस्तानात झाला होता. त्यानंतर ते दिल्लीत आले. दिल्लीत काही दिवस वास्तव्य केल्यानंतर ते मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर संघर्ष करत त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलं. यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटामुळे सागर सरहदी यांना खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली होती. तसंच त्यांनी अनेक गाजेलल्या चित्रपटासांठी संहिता लेखन केलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस