नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद फडणवीसांनी ‘सचिन वाझे हे काहींसाठी वसुली एजंटचं काम करत होते’, असा आरोप केला होता. या टीकेला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
कुणाच्या राज्यात कोण वसुली करत होतं आणि त्यांचे वसुली इनचार्ज कोण होते, यासंदर्भात किमान राजकारणातल्या लोकांनी तरी बोलू नये. हमाम में सब नंगे होते है, अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना उत्तर दिले.
दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीवर देखील संजय राऊत यांनी भाष्य केले. राऊत म्हणाले की, रमबीर सिंग यांची बदली हा मुद्दाच नाहीये. ज्या प्रकारचं वातावरण बनलं होतं, त्यावर मुख्यमंत्र्यांना वाटलं की ज्या अधिकाऱ्याबाबत शंका आहे, त्याचा तपास होईपर्यंत बदली व्हायला हवी. विरोधकांना वाटतंय हा खूप मोठा मुद्दा आहे. पण हा मुद्दाच नाहीये. जर विरोधकांना याचा मुद्दा बनवायचा असेल, तर तो त्यांनी पुढची साडेतीन वर्ष तो बनवत राहावा. सरकारचा केसही कुणी वाकडा करू शकत नाही.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस