नवी मुंबई : 26 जानेवारी 2014 साली वाशी टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. राज ठाकरेंच्या प्रक्षोभक भाषणामुळे ही तोडफोड झाल्याचा आरोप पोलिसांनी केला.
वाशीच्या टोलनाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी न्यायालयात सुनावणीसाठी दाखल झाले. त्यावेळी मनसेने सरकारला इशारा दिला आहे. शेकडो गुन्हे दाखल केले गेले तरी ज्वलंत विचार आणि बुलंद आवाज रयतेच्या न्याय-हक्कांसाठी घुमणारच…! असं ट्विट मनसेने केलं आहे.
याआधी 2018 आणि 2020 सालीही न्यायालयाने राज ठाकरेंना वाशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते, पण ते हजर न राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला, त्यामुळे त्यांना आता न्यायालयात हजर राहावं लागलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
