• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी उपोषण होणारच ; विक्रम ढोणे

tdadmin by tdadmin
January 24, 2021
in सोलापूर जिल्हा
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

सोलापूरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकासंदर्भात राज्य शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ सोमवार, दि. 25 जानेवारीपासून बेमुदत उपोषण होणार आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी आमचे उपोषण होणार असल्याचे धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितले.

सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींचे स्मारक हे शासकीय निधीतून झाले पाहिजे, अशी भुमिका घेवून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे नमूद करून ढोणे यांनी म्हटले आहे की, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑक्टोंबरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मारकाचे भुमीपूजन करण्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेला पाच महिने उलटले तरी भुमीपूजन झालेले नाही. शिवाय शासनाने एक रूपयाचीही तरतूद केलेली नाही. सरकारचे प्रतिनिधी फक्त घोषणा करून मोकळे झाले आहेत.
यासंदर्भात शासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर दि. 25 जानेवारी 2020 पासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत. अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी तरतुदीचा लेखी आदेश काढावा आणि भुमीपूजनाची नेमकी तारीख जाहीर करावी, अशी आमची मागणी आहे.

मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही हे आंदोलन आम्ही करणार आहोत. आमचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून केले जाणार आहे, तसे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लेखी दिले आहे. त्यामुळे पोलिसांनीही सहकार्य करावे, उगीच प्रकरण संवेदनशील करू नये, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी स्मारकप्रश्नी उदासिनता सोडावी आणि पुढाकार प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन आम्ही केले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. तोपर्यंतच पोलिसांनी आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. स्मारकाचा विषय हा सामजिक असताना पोलिस प्रशासनाने दडपशाहीची भुमिका घ्यायची गरज नव्हती. पालकमंत्री व प्रशासनाने आमची भुमिका ऐकून घेवून मार्ग काढावा, अशी संवादी भुमिका आमची आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळावा, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

Tags: #Vikram_Dhone_Jat#विक्रम ढोणे जत
Previous Post

WhatsApp मध्ये फिंगरप्रिंट लॉक करायचे आहे, तर मग करा या स्टेप फॉलो

Next Post

सांगलीतून स्वाभीमानीचा ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापूरच्या दिशेने

Next Post

सांगलीतून स्वाभीमानीचा ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापूरच्या दिशेने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा अशा पद्धतींनी घेतल्या जाणार’ : उदय सामंत यांची घोषणा

February 27, 2021
“त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात” : कॉंग्रेस नेत्याचा दावा

“त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात” : कॉंग्रेस नेत्याचा दावा

February 27, 2021
सावधान : तुम्हाला कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे पाठवल्या गेलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका ; गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

सावधान : तुम्हाला कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे पाठवल्या गेलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका ; गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

February 27, 2021
‘राजा हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला आहे’ : भातखळकर

‘राजा हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला आहे’ : भातखळकर

February 27, 2021
…तर फडणवीस सरकारने तेव्हाच गुन्हा दाखल केला असता : कॉंग्रेस नेत्याने दिले भाजपाला प्रत्युत्तर

…तर फडणवीस सरकारने तेव्हाच गुन्हा दाखल केला असता : कॉंग्रेस नेत्याने दिले भाजपाला प्रत्युत्तर

February 27, 2021
पदोन्नतीतील आरक्षण बाबत महाराष्ट्र शासनाकडून दिशाभूल : रिपब्लिकन स्टुडंट युनियन

पदोन्नतीतील आरक्षण बाबत महाराष्ट्र शासनाकडून दिशाभूल : रिपब्लिकन स्टुडंट युनियन

February 27, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143