शिर्डी : महाराष्ट्र आणि मुंबईची पोलीस यंत्रणा हि जगप्रसिद्ध आहे. स्कॉटलंड यार्ड नंतर आपल्या मुंबई पोलिसांचं नाव घेतल जातं. मग अशा वेळी पोलिसांचं मनोबल खच्ची होणार नाही याची काळजी सत्ताधारी आणि विरोधकांनी घ्यायला हवी. विरोधक सत्तेत होते तेव्हा तेच पोलीस दल होतं. आपलं पोलीस दल सक्षम आहे, आमचा त्यावर विश्वास आहे, अशी प्रतिकया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सचिन वाझे प्रकरणी दिलीय.
सरकारं बदलत असतात पण पोलिस यंत्रणा आहे तीच असते, त्यामुळे पोलीस यंत्रणेवर विश्वास हवा, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय. विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपासासाठी आग्रह धरणं म्हणजे आम्हाला काळजीच वाटत की यात कुठले राजकारण तर नाही ना?, सचिन वाझे प्रकरणात काळजीच्या गोष्टी वाटतायत मात्र तपास सुरू असल्याने त्यावर सध्या बोलणे योग्य नसल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस