मुंबई : सहा नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधल्यानंतर यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, ‘सिंधुदुर्गातल्या वैभववाडीतले 6 नगरसेवक अमित शाहांच्या पायगुणानं गेले नाही. पण ते नगरसेवक गेले म्हणजे भाजपचं पुन्हा सरकार येणारच नाही, असं नाही.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर गिर गये तो भी टांग उपर, असं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं आहे, असो खोचक टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

विनायक राऊत म्हणाले की, आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना कंटाळून हे सगळे नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. भविष्यात येणारी जी निवडणूक आहे या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना आणि महाविकासआघाडी ही स्वतःची प्रचंड ताकद दाखवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
