जळगाव : महाविकास आघाडीनं भारतीय जनता पक्षाला धक्का देऊन जळगाव महापालिकेची सत्ता खेचून आणली आहे. जळगावात शिवसेनेचा महापौर विराजमान झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजप आणि गिरीश महाजन यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. जळगावत सत्ता परिवर्तनाची रणनीती कशी आखली गेली, हेही खडसे यांनी उघड केलं आहे.
जळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. पण भाजपकडून जनतेच्या ज्या काही अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत. रस्त्यांची दुरवस्था झाली होती. पाण्याची समस्या होती. नागरिकांबरोबरच नगरसेवकही नाराज होते. त्या नाराजीतून नगरसेवक स्वत:हून आमच्याकडं आले आणि सत्ता परिवर्तन सोपं झालं,’ असं खडसे म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
.