पुणे : बांधकाम- हॉटेल व्यावसायिक व राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांच्या पुण्यातील अभिल हाऊस या कार्यालयावर अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने छापेमारी केली आहे. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. विदेशी चलन प्रकरणात अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ईडीचे अधिकारी सकाळी ८. ३० पासून अभिल कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आयबीच्या परवानगीविना विदेशी बँकेतील अकाउंटमध्ये ५०० कोटी कसे जमा झाले, असा संशय ईडीला आहे. त्यासंबंधी ईडी अधिक तपास करत आहे. याआधीही नोव्हेंबरमध्ये अविनाश भोसले यांची ईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबरमध्ये ईडीने भोसले यांना मुंबईत चौकशीसाठी बोलवून घेतलं होतं. तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यानं त्यांची तब्बल दहा तास चौकशी केली होती.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
