नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत संभ्रम वाढला असून सायबर मीडिया रिसर्चच्या एका सर्वेनुसार, आता २८ टक्के युजर्स व्हॉट्सअॅपचा वापर बंद करणार असल्याच्या विचारात आहेत. तर ७९ टक्के युजर्स असे आहेत ज्यांनी अजून यासंबंधी विचार केलेला नाही. आपली नवीन प्रायव्हसी पॉलिसी व्हॉट्सअॅप ८ फेब्रुवारी २०२१ पासून लागू करणार होते. पण, याला सध्या काही महिन्यासाठी पुढे ढकलले आहे.
कंपनीला युजर्संकडून मिळालेल्या निगेटिव्ह रिस्पॉन्समुळे आपली पॉलिसी मे २०२१ पर्यंत पुढे ढकलावी लागली आहे. कंपनी या दरम्यान युजर्संना या पॉलिसीसंबंधी समजवून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कंपनीला नवीन पॉलिसीला लागू करण्याच्या तारखेचा निर्णय फायदेशीर ठऱला आहे. अन्यथा अनेक जण व्हॉट्सअॅप सोडण्याच्या विचारात होते.
युजर्संमध्ये व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीमुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. यावरून ४९ टक्के युजर्स नाराज झाले आहेत. तसेच ४५ टक्के युजर्सने व्हॉट्सअॅपवर विश्वास ठेवला आहे. ४५ टक्के युजर्सने व्हॉट्सअॅपवर ३५ टक्के युजर्संनी ब्रीज ऑफ ट्रस्ट म्हणजेच विश्वास तोडल्याचे म्हटले आहे.
सायबर मीडियाच्या रिसर्चमध्ये म्हटले की, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरहून जास्त युजर्स थर्ड पार्टी सर्वरवर स्टोर केले जात असल्याने चिंताग्रस्त आहेत. रिसर्च फर्मच्या माहितीनुसार, जवळपास रोज स्पॅम मेसेज व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरच्या ५० टक्के हून जास्त युजर्सला येतात. रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, सर्वेत भाग घेणाऱ्या युजर्समध्ये ५० टक्के अज्ञात नंबरवरून संदिग्ध मेसेज मिळत होते. यात फिशिंग अटॅक वायरसचे लिंक होते.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
