मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी जगतप सिंग आनंद आरोपीला अटक करण्यात आली असून ८ फेब्रुवारीपर्यंत त्याला एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं. आतापर्यंत सुशांतच्या मृत्यूप्रकरणी जवळपास ३० पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.याप्रकरणात कलाविश्वातील अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांनादेखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता जगतप सिंग आनंदला अटक करण्यात आली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
