आटपाडी : आटपाडी शहरातील नंदीवाले वसाहत व ब्राह्मण गल्ली येथे डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने नंदीवाले वसाहत, ब्राह्मण गल्ली, वाणी गल्ली व मशिद परिसर येथे आटपाडी ग्रामपंचायत मार्फत औषध धूर फवारणी करण्यात आली असून याबाबत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आटपाडीच्या सरपंच वृषाली पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
डेंग्यूच्या रोगाची आळी ही स्वच्छ पाण्यावर व कुंभाराची मातीची गाडगी तसेच वाहनांचे टायर्स मधे तयार होत असते. त्यामुळे घरातील स्वच्छ पाणी उघडे ठेवू नये व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा. तसेच आपल्या परिसरातील कुंभाराची मातीची गाडगी, रिकामी बॅरल्स व वाहनाची टायर्स नष्ट करण्याचे आवाहन सरपंच वृषाली पाटील यांनी केले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस