म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड सारख्या शहरात भूल तज्ज्ञाची कमतरता ओळखूनच देवापुरचे सुपुत्र डॉ.विकास बाबर यांनी डिप्लोमा इन अनेस्थेशियाचा अभ्यासक्रम पूर्ण करुन भूलतज्ञ म्हणून मान्यता मिळवली. डॉ.बाबर व त्यांच्या पत्नी स्त्रीरोग तज्ञ सौ. मनीषा बाबर ह्या गेल्या १५ वर्षांपासून म्हसवड शहरात स्वतःच्या श्री हॉस्पिटल मध्ये रुग्ण सेवा करीत आहेत. म्हसवड सारख्या शहरात भुलतज्ञांची संख्या कमी असल्याने वयाच्या पंचेचाळीशित हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची किमया त्यांनी साधली आहे.
त्यांनी NEET-PG ही परीक्षा देऊन मेरिट मधून डिप्लोमा इन अनेस्थेशिया (Diploma in anaesthesia) ला ऍडमिशन मिळवली. या दोन वर्षाचा कोर्स मध्ये कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये साध्या शस्त्रक्रिया पासून हृदयाच्या बायपास सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेच्या अनुभव घेऊन ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या सी.पी.एस. मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये फर्स्ट क्लास ने उत्तीर्ण झाले आहेत.
आर्थिक परिस्थितीचा सामना करीत त्यांनी एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केली होती. तदनंतर वैद्यकीय सेवेत दिलेले योगदान हे अतुलनीय असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच भूलतज्ज्ञ या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे म्हसवड सह परिसरातून कौतुक होत आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस