सांगली: मुकेश अंबानी यांच्यासाठी सचिन वाझे यांना खलनायक करण्याचं काम डबल ढोलकी देवेंद्र फडणवीस यांनी केलंय,”भाजपचे नेते म्हणजे डबल ढोलकी आहेत. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.
ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. ‘ अंबानी हेच शेतकरी आंदोलनातील आरोपी होते, मात्र त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून भाजपनं अधिवेशन वाया घालवलं. अंबानींच्या कुटुंबीयांना झेड प्लस सुरक्षा मिळावी, तसंच त्यांच्या बंगल्यावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी यासाठी फडणवीसांनी हा खटाटोप केला, असं पटोले म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस