मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी हॉटेल, उपहारगृह आणि मॉलच्या प्रतिनिधींची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत नियमांचं पालन करण्याचं आवाहन करताना कडक निर्बंधांचा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.
“लॉकडाऊन लागू करून सगळं बंद करणं आम्हालाही नको आहे. पण मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं अशा नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. आम्हाला कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस