मुंबई : बंदुकीचा धाक दाखवून मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर ट्रॅफिकमधून मार्ग काढत असलेल्या एका गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या गाडीच्या मागच्या बाजूला शिवसेनेचा वाघ असलेलं स्टिकर होतं. एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेयर केला. यानंतर आता भाजपनेही शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनीही यावरून शिवेसेनेवर निशाणा साधला आहे. चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्र मध्ये ??, असा सवाल नीलेश राणेंनी उपस्थित केला आहे.
चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्र मध्ये ??
तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
