मुंबई : आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये, असे मत शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी रविवारी मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत मांडले.
मराठा समाजातील विविध पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी वडाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय बैठकीसाठी उपस्थित होते. या वेळी मेटे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने नवीन कायदेतज्ज्ञांचा समावेश करून पुढील रणनीती ठरवावी. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकार काय करणार याबाबत ४ जानेवारीपर्यंत सरकारने चर्चा करावी आणि जो निर्णय घेतला त्याबाबत पुन्हा मराठा समाजातील नेत्यांची बैठक घेऊन माहिती द्यावी.
जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये. डिसेंबरपर्यंत सरकारने काहीच हालचाल केली नाही तर जानेवारीत बैठक घेऊन आगामी काळातील आंदोलन, रास्ता रोको, धरणे आंदोलन याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस
