आटपाडी : सध्या देशात व राज्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाची लस बाजारात आली असली तरी कोरोनाचे रुग्ण सापडल्याचे प्रमाण वाढू लागले आहे. नागरिक शासनाच्या दिलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष करीत असून मास्क चा वापर करत नसल्याने कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
या वाढत्या कोरोनाला काही प्रमाणात आळा बसावा म्हणून जिवलग ग्रुप ने सामाजिक बांधलकी जपली असून ग्रुपच्या वतीने दिघंची बाजारात ज्यांना मास्क नाही अशा नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात येवून कोरोना या संसर्गजन्य विषाणू रोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
जिवलग ग्रुप चे अध्यक्ष नितीन डांगे, उपाध्यक्ष अजमुद्दीन इनामदार, नितीन चोथे (पंच) , विक्रम चव्हाण, सचिन सावंत, संजय पुजारी, प्रथमेश भिंगे, सुजित पाटील, नवनाथ डांगे, अमन मुलाणी व इतर मान्यवर उपस्थित होते.
Join Free Telegram माणदेश एक्सप्रेस
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस