मुंबई : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. यावेळी इतर नेतेही उपस्थित होते. या बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “जबाबदारी मोठी आहे आणि ती पार पाडण्यास मला निश्चित आवडेल. मी दुपारी १.३० वाजल्यानतंर मंत्रालयात येऊन पदभार स्वीकारणार आहे”.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस