करगणी : हिवतड व नेलकरंजी ता. आटपाडी, जि. सांगली येथे डिजिटल आर्थिक साक्षरता मेळावा संपन्न झाले. बँक ऑफ इंडिया च्या वतीने व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड आणि नाबार्ड आर्थिक समावेशिकारण यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यामध्ये बँकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना व महिला बचत गटांना देण्यात आली. नाबार्ड मार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत. यामध्ये महिला बचत गट, पेन्शन योजना, द्राक्ष बाग उभारणे, घर बांधणे, शेळी मेंढी पालन याविषयी माहिती देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना व अटल पेन्शन योजना या विमा योजनांची माहिती ग्रामस्थांना व विशेषतः महिला बचत गटांना देण्यात आली. त्याचबरोबर डिजिटल पद्धतीने व्यवहार हे कसे करावेत याबद्दल ही माहिती देण्यात आली.
यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामार्फत डिजिटल मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यात आले. तसेच हिवतड आणि नेलकरंजी परिसरात वाढत असलेल्या नगदी पिकाचा विचार करता आजच्या घडीला डिजिटल पेमेंट ही संकल्पना किती महत्त्वाची असल्याचे ग्रामस्थांना पटवून देण्यात आले. यामुळे गावातील शेतकरी वर्गांचा मिरची, वांगे, टोमॅटो, झेंडू व इत्यादी फुले व पालेभाज्या पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर या बाजारपेठेत विक्री साठी जातात व विक्री केलेल्या मालाचे पैसे त्याच दिवशी आपल्या बँक खात्यात जमा होण्यासाठी व योग्यवेळी आपले पैसे आपल्या उपयोगात घेण्यासाठी कोणत्याही मधस्थ यांच्यावर विसंबून न थांबता आपण केव्हाही आपल्या खात्यातून पैसे काढू शकतो किंवा औषधे बी-बियाणांची बिल भरू शकतो याचे महत्व पटवून देण्यात आले.
यावेळी हिवतड ग्रामस्थांच्या वतीने लवकरच गावात अतिरिक्त भरणा केंद्र हे चालू करावे अशी मागणी सुद्धा आज करण्यात आली. या मेळाव्यासाठी हिवतड गावाच्या सरपंच सौ. रुपाली सरगर, वसंत माळी, हिवतड वि. का.स.सो. चे चेरमन दगडू देशमुख तसेच मार्गदर्शक नाबार्ड अधिकारी ऑफिसचे लक्ष्मीकांत कट्टी, टी. डी. ओ. श्री. साळुंखे , प्रकाश गावंदरे फिल्ड ऑफिसर, प्रफुल जाधव शाखाधिकारी, आकाश पाटील, कृषी सह्यक विनायक देशमुख, श्री म्हारगुडे व दोन्ही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस



