मुंबई : आंदोलनातील हिंसाचारावर बोलताना काल हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली?, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी पवारांवर निशाणा साधला होता.
आशिष शेलारांनी शेतकरी आंदोलनावरून शरद पवारांवर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पुराव्यासकट उत्तर दिले आहे. जेव्हा शरद पवार फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा तुम्ही काय झोपले होते का?, असा सवाल राष्ट्रवादीने आशिष शेलारांना केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी पवारांवरील टीकेला उत्तर दिले. जेव्हा शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा तुम्ही काय झोपले होते का? गुड मॉर्निंग आशिष शेलार, झोपेतून उठा आणि ही लिंक चेक करा, असे ट्विट करत क्रास्टो यांनी शेलारांना उत्तर दिले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
