मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे नव्या वादात अडकले आहेत. धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्मा या महिलेनं केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सविस्तर खुलासा करत सहमतीनं संबंध असल्याचं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, याची आपण नोंद घ्यावी,” अशी मागणी उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
